क्राईम न्युज
विष्णुनगर पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम

दि.03.03.2024 रोजी ते दि.28.05.2024 रोजी चे दरम्यान, फिर्यादी श्री.रोहित विश्वास कोत्रे, वय 29 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.उमेशनगर, डोंबिवली पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने टेलिग्राम ॲपवर एक लिंक पाठविली. सदर लिंकव्दारे लॉगीन करण्यास सांगून टेलिग्राममधील प्रोडक्टला फिडबॅक केल्यास अधिक पैसे मिळण्याचे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीत याने फिर्यादी यांना एकुण 20,75,781/- रूपये रक्कम त्याचे विविध बँक खातेवर ऑनलाईन भरण्यास भाग पाडुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा रजि.नं. ।। 704/2024 माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि(गुन्हे)/श्री.गमे हे करीत आहेत.

