आपला जिल्हाक्राईम न्युज
अहिल्यादेवींच्या अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करा, धनगर प्रतिष्ठानची ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी
ठाणे दि : पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक महान राणी, कुशल प्रशासक व जनकल्याणकारी नेत्या म्हणून संपूर्ण भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. अशा पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मिडिया (फेसबुक) वर सुनिल गोपाळ उभे (प्रोफाईल नाव) या व्यक्तीने अत्यंत घृणास्पद, अश्लिल व अपमानास्पद शब्दप्रयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्यामुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून हे केवळ एका थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा अपमान नाही तर समाजाच्या भावना दुखावण्याचे गंभीर कृत्य आहे.सदर प्रकरणी आपण तात्काळ दखल घेऊन सदर व्यक्तीची खरी ओळख पटवून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा आणि सदर खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून कठोरात कठोर शिक्षा व्हावी.अशी मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली असून तसे निवेदन नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय दवणे यांना देण्यात आले यावेळी त्यांना धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा अध्यक्षा माधवी बारगीर,समाजसेवक दत्तात्रेय चिव्हाणे,धनगर प्रतिष्ठानचे खजिनदार अनिल जरग,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर, अविनाश लबडे, अरुण परदेशी, प्रशांत कुरकुंडे, अनिकेत पाडसे, किरण धायगुडे, महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड,सुषमा बुधे,सीमा कुरकुंडे आदिसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



