ताज्या घडामोडी
संत ज्ञानेश्वर यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त काढण्यात आली दिंडी
ठाणे महापालिका आणि संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांचा संयुक्त उपक्रम

आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार राजन विचारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी झाले दिंडीत सहभागी
ठाणे (१६) : संत ज्ञानेश्वर यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात दिंडी काढण्यात आली. ठाणे महापालिका आणि संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांनी संयुक्तपणे केलेल्या या उपक्रमात ठाणेकर नागरिक, वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संत ज्ञानेश्वर मंदिर पाचपाखाडी येथून सुरू झालेल्या या दिंडीमध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार राजन विचारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, संत ज्ञानदेव सेवा मंडळाचे अजित मराठे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, अभय मराठे, मधुकर घोलप, अशोक घोलप यांच्यासह वारकरी मंडळी सहभागी झाली.
ज्ञानोबा-तुकारामचा गजर करीत संत ज्ञानेश्वर मंदिर, महापालिका मुख्यालय, कलावती मंदिर येथून ही दिंडी धर्मवीर आनंद दिघे मार्गावरून पुन्हा संत ज्ञानेश्वर मंदिराकडे आली. महापालिका मुख्यालयासमोर वारकरी मंडळींनी रिंगण केले आणि जयघोष केला. त्यानंतर, मंदिरापाशी दिंडीचे विसर्जन होऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती, भजन करून या सोहळ्याची सांगता झाली.


