नौपाडा पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम

दि.12.07.2024 रोजी चे सुमारास, फिर्यादी श्री.पुष्कर रघुनाथ शेजवलकर, रा.मखमली तलावा शेजारी, ठाणे पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हॉट्स ॲपवर बॅकेची केवायसी अपडेट नसल्याचे खोटे सांगुन कस्टमर केअरला संपर्क साधण्यासाठी खोटा नंबर देवुन ॲप डाऊनलोड करण्यास सांगुन त्यावर डेबीट कार्डची संपुर्ण माहिती फिर्यादी यांनी भरली असता, त्यानंतर आरोपीत याने लबाडीने एकुण 8,30,000/- रूपये रक्कम फ्रॉड ट्रान्सझॅक्शन करून ऑनलाईन पध्दतीने स्वताच्या खात्यावर वळते करून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा रजि.नं. ।। 867/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 319(2), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि/श्री.कुंभार हे करीत आहेत.

