शांतीनगर पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग

आरोपी कादीर ऊर्फ बाब ईस्माईल शेख, वय 40 वर्षे, रा.चव्हाण कॉलनी, भिवंडी यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड व पालघर जिल्हा या महसुली हद्दीतुन 2 वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, दि.17.05.2024 अन्वये दिले होते. परंतू सदर आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये मा.पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, दि.25.07.2024 रोजी 17.35 वा. चे सुमारास, चव्हाण कॉलनी, कासीमनगर, भिवंडी येथे गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडी चे पथकास मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि.नं.।। 1442/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी कादीर ऊर्फ बाब ईस्माईल शेख, वय 40 वर्षे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोना/4255 धायगुडे हे करीत आहेत.

