शतक महोत्सवी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भव्य ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

ठाणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेचे शतक महोत्सवी वर्ष व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल या शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी संस्थेच्या सर्व शाळांचा संयुक्त ध्वजारोहण कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यवाह आल्हाद जोशी , संस्थेचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांचे शाळेचे एनसीसी व बँड पथकाने भव्य स्वागत करण्यात आले.
संस्थेचे कार्यवाह आल्हाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात बासरी बँड पथकाने राष्ट्रगीत गायले, संस्थेच्या शाळेतील शिक्षिकांनी सामूहिक राज्य गीत गायले.
शाळांच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते गायली. त्यानंतर मैदानावर एनसीसी संचलन, मानवी मनोरे, देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांची कवायत, लेझीम असे सुरेख कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर भोळे सभागृहात संस्थेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली. वेशभूषेत भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्यवाह आल्हाद जोशी, उपाध्यक्ष अविनाश भोळे, संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक श्रीमती साधना शिंदे, श्रीमती मंगला करंदीकर, श्रीमती मेघा भंडारे, श्रीमती रेखा वाघ, श्रीमती ममता माखीजांनी, भानुदास पाटील, श्रीमती निकिता कोठारी, श्रीमती रिया कुंडू, दादराज कर्णावर, किरण कुमार चव्हाण, साधना बैले हे उपस्थित होते कवायत, लेझीम, मनोरे, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा स्पर्धा आयोजनात शाळेतल्या सर्व शिक्षकांचे योगदान लक्षणीय ठरले.



