मानपाडा पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम

दि.18.07.2024 रोजी ते दि.20.07.2024 रोजी पावेतो, फिर्यादी महिला, वय 32 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.लोढा पलावा, डोंबिवली पूर्व यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने फोन करुन Fedex Internation courier या कंपनीतुन बोलत आहे असे सांगुन तुमचे पार्सल मुंबई ते थायलँड असे पाठविले आहे. व त्यात 5 पासपोर्ट, तीन क्रेडीट कार्ड, MDMA व्ड्रग्स् लॅपटॉप असा माल आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून क्राईम ब्रांच मुबंई येथुन बोलत आहे असे सांगुन त्यांनाआरोपीत याने त्याचे विविध बँक खातेवर एकुण 12,53,090/- रूपये रक्कम ऑनलाईन भरण्यास सांगुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा रजि. नं. ।। 913/2024 माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/मुसळे हे करीत आहेत.

