महात्मा फुले चौक पोलीस ठाणे-खूनाचा प्रयत्न

दि.23.07.2024 रोजी सायंकाळी 07.30 वा.ते 08.00 वा. चे दरम्यान, नंदनवन सोसायटीच्या समोर, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण पश्चिम येथे, फिर्यादी श्री.सागर कोंडीराम टेंभे, वय 34 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.बापसाई, कल्याण व श्री निलेश दिलीप जाधव, वय-37 वर्षे, रा.टिटवाळा, यांचेवर 7 ते 8 अनोळखी इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पान्हा व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमी श्री.निलेश दिलीप जाधव, वय 37 वर्षे यांना सिध्दीविनायक हॉस्पीटल, कल्याण पश्चिम येथे औषधोपचारासाठी दाखल केले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा रजि.नं.। 744/2024 बि.एन.एस चे कलम 109,189(2),191(2), 191(3),190,सह महा.पो.का.क.37(1),135, सह भारतीय हत्यार कायदा 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि/श्री.विजय नाईक हे करीत आहेत.

