नौपाडा पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम

दि.04.07.2024 रोजी ते दि.10.07.2024 रोजी चे दरम्यान, फिर्यादी श्री.रवीराज सदानंद साळुंके, वय 54 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.खोपट, ठाणे यांना अनोळखी मोबाईलधारक इसमांनी व्हॉट्स ॲपवर मॅसेज करून Goldman Sachs Investment Securities चे व्हॉट्स ॲपवर ग्रुपवर ॲड करून त्याव्दारे शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर आरोपीत यांनी फिर्यादी यांचेकडुन एकुण 34,62,000/- रूपये रक्कम ऑनलाईन घेवुन ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा रजि.नं. ।। 877/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि/श्री.तांबे हे करीत आहेत.

