क्राईम न्युज
कोनगाव पोलीस ठाणे – घरफोडी

दि.27.07.2024 रोजी रात्रौ 23.00 वा. ते दि.28.07.2024 रोजी सकाळी 10.10 वा. चे दरम्यान, फिर्यादी श्री.अमोल ताराचंद परदेशी, वय 34 वर्षे, व्यवसाय-मोबाईल शॉप, रा.वासुदेव पाटील नगर, कोनगाव यांचे गाळा नं.01, यश मोबाईल शॉप, कोनगाव या दुकानाचे उजव्या बाजुची भिंत कोणीतरी अज्ञात चोरटयाने फोडुन त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील एकुण 8,13,209/- रुपये रोख किंमतीचे मोबाईल फोन घरफोडी चोरी करून नेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. । 826/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/एस आर सकपाळ हे करीत आहे.

