खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून 5 सराईत गुन्हेगारांना दोन गावठी पिस्टल, दोन मॅगझीन, 37 जिवंत काडतूसासह अटक

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडील पोशि/अरविंद शेजवळ, यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने केलेल्या दिनांक 04/08/2023 रोजी 21ः 45 वा इकडील अधिकारी अंमलदार यांचेसह डाॅ मुस चैक, तलावपाळी फुटपाथवर सापळा कारवाई करून खुनाचे तीन गुन्हे दाखल असलेला रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार नामे मुन्ना राजबली दुबे वय 35 वर्ष धंदा बेकार सध्या राह. भाडयाचे खोलीत, कोपरीगाव, कोपरखैरणे, नवी मुंबई, मुळ रा. स्वतःचे घर, मारोतीनगर, बलबतरा रोड, भोजपूर, जि.आरा, थाना आरानगर, राज्य बिहार हा कोणतातरी दखलपात्र स्वरूपाचा गंभिर गुन्हा करण्याचे इरादयाने दोन गावठी बनावटीचे पीस्टल, दोन मॅगझीन, 7 जिवंत काडतुस असा एकूण 61,850/- रूपये किमतीचे अग्नीशस्त्रासह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरूद्ध नौपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 228/2023 शस्त्र अधिनियम कलम 3, 25(1ब)(अ) सह महा.पो.का.कलम 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयामध्ये अटक आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्याचे राहते घरातून 3000/- रूपये किमतीचे एकूण 30 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत
सदर आरोपीताने यापुर्वी पीस्टल व रांउड हे त्याचे ओळखीचे सराईत गुन्हेगारांना विक्री केल्याचे सांगितल्याने नमुद गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
2)शोएब याकुब मन्सुरी, वय 29 वर्षे, रा.शिवालीक बिल्डर याचे बांधकाम साईटवर, करंजडे, सेक्टर आर 3, ता. पनवेल, जिल्हा रायगड, यास दिनांक 06/08/2023 रोजी 19ः30 वा अटक.
3) विजय हरिश्चंद्र पवार, वय 33 वर्षे, रा. स्वतःचे घर, वांवजे गाव, ता. पनवेल, जिल्हा रायगड यास दिनांक 08/08/2023 रोजी 16ः15 वा अटक
4) अमित वरदराज भट, वय 39 वर्षे, रा. सध्या -भाडयाची खोली, पहिला माळा, प्लाॅट नं. 221, सद्गुरू मेडीकलजवळ, सेक्टर 31, वाषी, नवी मुंबई,
5) राजेश बाळाराम कुरूंगळे, वय 32 वर्षे,, सध्या रा. फ्लॅट नं. 204, हेरंब काॅम्पलेक्स, रिसगाव, रसायणी, रायगड,
आरेापी क्रमांक 4 व 5 यांना दिनांक 09/08/2023 रोजी 09ः35 वा अटक.
वरील सर्व आरोपीतांकडून गुन्हयामध्ये एकूण दोन गावठी पिस्टल, दोन मॅगजीन, 37 जिवंत काडतुसे असा एकूण 64850/रूपये किमतीचे अग्निशस्त्रे, काडतुसे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींची दिनांक 14/08/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक, विजयकुमार राठोड हे करीत आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिरी/पोपट नाळे, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडेे, सपोउनि/संजय बाबर, सपोउिन/कल्याण ढोकणे, पोहवा/जगन्नाथ सोनवणे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/सुहास म्हात्रे, पोहवा/संजय राठोड, मपोहवा/शितल पावसकर, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/तानाजी पाटील, पोशि/देवेंद्र देवरे, मपोशि/मयुरी भोसले, चापोना/भगवान हिवरे, सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केली आहे.


