क्राईम न्युज

कोनगाव पोलीस ठाणे – अंमली पदार्थ जप्त

दि.09.08.2023 रोजी 13.20 वा. चे सुमारास, गुन्हे शाखा, युनिट-2, भिवंडी चे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून, सपोनि/केदार, पोहवा/4546 पाटील व त्यांचे पथकाने रांजनोली नाका, ट्राफीक चौकीपासुन नाशिककडे जाणा-या सर्विस रोडवर, भिवंडी येथे सापळा रचुन आरोपी अस्लम अब्दुलकादीर समा, वय 38 वर्षे, रा.भूज, राज्य -गुजरात यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ 65.78 ग्रॅम मोफेड्रॉन पावडर (एम.डी.) हा अंमली पदार्थ‍, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, व रोख रक्कम असा एकुण 4,65,500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द गुन्हा रजि. नं. I 259/2023 एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/धनराज केदार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??