क्राईम न्युज
मृत इसमाची माहिती देण्याचे आवाहन
ठाणे दि.26 (जिमाका) : – ठाणे येथील शिळ तलावात अनोळखी इसम आढळून आल्याने त्यास औषधोपचारासाठी शिवाजी रुग्णालय, कळवा ठाणे येथे आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मृत इसमाचे वर्णन असे :- अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, अंगाने मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, अंदाजे उंची पाच फुट पाच इंच, रंग सावळा, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी बारिक वाढलेली.
या इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी शिळ डायघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिळ डायघर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले

