आपला जिल्हा

कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

        नवी मुंबई, दि.26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली  येथे  हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर , विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र  प्रविण पवार, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रक पथक, नवी मुंबई पुरुष पोलीस पथक क्र.1,  बँड पथक, डॉग स्कॉड, मार्कस मॅन वाहन, आर.आय.व्ही.वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, मिनी वॉटर टेंडर, रेस्क्यु व्हॅन, नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन वाहन आदिंनी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगीरी करणारे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सहायक आयुक्त पोलीस  शैलेश पासलवाड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल, वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांना हायप्रोफाईल गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास लावण्याबद्दल तसेच पनवेल शहरचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.112, करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.15 शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.18 सानपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी  विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले.

            या कार्यक्रमास अपर आयुक्त किशन जावळे, उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख,  उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (पुर्नवसन) रिता मेत्रेवार, उपायुक्त (पुरवठा) लिलाधर दुफारे, उपायुक्त (करमणूक) मंदार वैद्य,  उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, उपायुक्त (रोहयो) अजित साखरे, विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, सेवाकर उपायाक्त कमलेश नागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??