क्राईम न्युज

कापुरबावडी पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम

दि.29.05.2024 रोजी ते दि.14.07.2024 रोजी पावेतो, फिर्यादी श्री.वैभव तात्यासाहेब कांगणे, वय-44 वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.लोढा अमारा, कोलशेत, ठाणे पश्चिम यांनी फेसबुक वरील लिंकवर क्लीक केले असता, 2 अनोळखी मोबाईलधारक इसमांनी व्हॉट्स ॲप ग्रुपवर ॲड करून, त्यांना शेअर ट्रेडिंग करणेकरिता आयडीबीआय बँक खातेतुन एकुण 05,49,564/- रूपये रक्कम ऑनलाईन आरोपीत याचे बॅक खात्यावर पाठविण्यास सांगून ती परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा रजि. नं. ।। 656/2024 माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क),(ड) सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/एस के महाडीक हे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??