सिंधुदुर्ग तालुक्यातील विजयदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला
विशेष बाब म्हणजे हा भारतीय तिरंगा ध्वज 365 दिवस 24 तास फडकणार आहे
प्रतिनिधि
सिंधुदुर्ग तालुक्यातील विजयदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई सब सर्कल मुंबई यांच्या वतीने पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाची खास आणि विशेष बाब म्हणजे हा भारतीय तिरंगा ध्वज 365 दिवस 24 तास फडकणार आहे त्यासाठी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती.
या कार्यक्रमास आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई सब सर्कल मुंबई विभागाकडून राजाराम पुंजाबा दिवेकर सीनियर कंजर्वेशन असिस्टंट हजर होते तसेच या गावचे प्रथम नागरिक सरपंच रियाज काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सदस्य सरपंच प्रसाद देवधर पंचायत समिती सदस्य शुभा कदम आणि विजयदुर्ग परिसरातील माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग जिल्हा प्राथमिक शाळा नंबर एक विजयदुर्ग उर्दू शाळा विजयदुर्ग वाडये वठार अंगणवाडी गावातील ग्रामस्थ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास पाचशे ते साडेपाचशे माणसांची उपस्थिती होती.





