हिललाईन पोलीस ठाणे – दरोडयाची तयारी

हिललाईन पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून सपोनि/अजय सखाराम गायकवाड व त्यांचे पथकाने दि.28.07.2024 रोजी 05.10 वा. चे सुमारास, धामटण नाका, खोणी रोड, अंबरनाथ येथे सापळा रचुन तेथे आरोपी क्र.1) युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार, वय 24 वर्षे, रा.सहयाद्रीनगर, उल्हासनगर-5 2) राहुल विलास गायकवाड, वय 25 वर्षे, रा.उल्हासनगर-5 3) वासुदेव दुर्गाचरण फकीरा, वय 38 वर्षे, रा.नेवाळी नाका, अंबरनाथ 4) कल्पेश उर्फ चिकु शांताराम बाविस्क्र, वय 19 वर्षे रा.गायकवाड पाडा, उल्हासनगर-5 5) अजय उर्फ कोयता जयराज पिल्ले , वय 22 वर्षे, रा. बापु जिवा चौक, पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, ते महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे समजले. सदर आरोपींकडुन एक लोखंडी पिस्तोल व जिवंत काडतुस, एक लोखंडी सुरा, मिरची पावडर, व नायलॉनची दोरी असे प्राणघातक हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकारा़बाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द गुन्हा रजि. क्र. I 599/2023 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4),(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/पडवळ हे करीत आहेत.

