कोपरी पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग

कोपरी पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग
आरोपी राकेश ऊर्फ राक्या प्रेमचंद गुरूदासानी, वय 28 वर्षे, रा.कशेळी, भिवंडी यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे यांनी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्हयांचे महसुली हद्दीतुन दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश, दि.19.01.2022 रोजी अन्वये दिले होते. परंतू सदर आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयांमध्ये मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना, सदर मनाई आदेशाचा भंग करून, दि.12.08.2023 रोजी दुपारी 16.30 वा. चे सुमारास, कोपरी बस स्टँड, ठाणे पुर्व येथे कोपरी पोलीस ठाणे चे पथकास मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. क्र. II 157/23 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी राकेश ऊर्फ राक्या प्रेमचंद गुरूदासानी, वय 28 वर्षे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि/खान हे करीत आहेत.

