नारपोली पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग

नारपोली पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग
आरोपी अनिल बजरंग राठोड, वय 27 वर्षे, रा.कारीवली गाव, भिवंडी यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी ठाणे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे आणि रायगड या जिल्हयांचे महसुली हद्दीतुन दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दि.27.05.2023 रोजी अन्वये दिले होते. परंतू सदर आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त परिमंडळ.2, भिवंडी यांचे परवानगी शिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, दि.11.08.2023 रोजी 23.15 वा. चे सुमारास, नारपोली, भिवंडी येथे नारपोली पोलीस ठाणे चे पथकास मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. क्र. II 632/23 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी अनिल बजरंग राठोड, वय 27 वर्षे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोउपनिरी/नवले हे करीत आहेत.

