क्राईम न्युज
वर्तकनगर पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल

वर्तकनगर पोलीस ठाणे – माहिती तंत्रज्ञान अधिनियम
दि.24.07.2023 रोजी ते दि.26.07.2023 रोजी पावेतो, फिर्यादी महिला, वय 50 वर्षे, व्यवयाय-गृहिणी, रा.ठाणे पश्चिम यांचे वडिलांना कोणीतरी एक अनोळखी मोबाईलधारक इसमाने फोन करून ॲक्सीस बॅंकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगुन त्यांच्या विश्वास संपादन करून, त्यांना Anydesk हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. सदर ॲप डाउनलोड केल्यानंतर आरोपीत याने फिर्यादी यांच्या वडिलांचे कॅनरा व ॲक्सीस बॅंक खातेतुन एकुण 6,12,034/- रूपये परस्पंर ऑनलाईन वळते करून घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द गुन्हा रजि. नं. । 265/2023 भा.द.वि.कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

