राबोडी पोलीस ठाणे – अन्न सुरक्षा आणि मानके गुन्हा दाखल

राबोडी पोलीस ठाणे – अन्न सुरक्षा आणि मानके
दि.10.08.2023 रोजी सकाळी 22.05 वा.चे सुमारास, गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे चे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून सपोनि/ सुर्यवंशी, सपोनि/काकड, सपोनि/धोंगडे, पोना/बडगुजर व त्यांचे पथकाने बापुजी नगर येथील अन्सारी हाउसच्या बाजुला, एका खोलीत, ठाणे पश्चिम येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी आरोपी आरीफ जफर शेख, वय 22 वर्षे, रा.बापुजीनगर, राबोडी नं.02, ठाणे पश्चिम याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थ एकुण 82,665/-रूपये किंमतीचा गुटखा, सुंगधी तंबाखु हा माल विक्रीकरिता बेकायदेशीरित्या जवळ बाळगला असताना मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. । 168/2022 भा.द.वि.कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 26 (2) (i),27 (3) (e), 26 (2) (iv) व 30 (2) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/खणकर हे करीत आहे.

