ताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना

ठाणे (२७) – सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली.

           पुणे येथील बाधिठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात ०२  उपअभियंता (यांत्रिकी), २ सुपरवायझर, ३ तांत्रिक कर्मचारी, ४ जेटींग वाहने ४ वाहनचालक, 8 ऑपरेटर/मदतनीस, १७७ सफाई कामगार, ०४ उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, ०७ वाहनचालक आदींचा समावेश आहे.

 त्याचबरोबर  ८० खराटे झाडू, ८० ब्रश, ८० फावडे, ८० काटेपंजे आदी साहित्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, ORS पॅकेट, पाणी व बिस्कीट आदींचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालकाचा समावेश आहे.

अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी  फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात ५ धुर फवारणी मशीन, दोन युटीलिटी वाहने ०१ इनोव्हा वाहन व औषधसाठ्यासह १० फवारणी पंपाचा समावेश आहे. या पथकासोबत २ स्वच्छता निरीक्षक, ०४ वाहनचालक,19 फाइलेरिया असे एकूण २५७ अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले आहेत. उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे पथक रवाना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??