रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी ठाणे टपाल विभाग सज्ज
राखी लिफाफे सोयीस्कर आकारात व किफायतशीर दरात उपलब्ध

ठाणे, दि. 26 : रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी टपाल विभाग, ठाणे विभाग सज्ज झाला आहे. विभागाने खास डिझाईन केलेले राखी लिफाफे आणले आहेत जे प्रथम श्रेणीचे मेल म्हणून भारतात आणि परदेशात कुठेही नाममात्र दराने पाठवले जातील.
हे लिफाफे रक्षाबंधनासाठी खास वॉटरप्रूफ केलेले आहेत. हे लिफाफे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. या लिफाफ्यांच्या कव्हरवर राखी डिझाइन असतात ज्यामुळे आम्हाला हे मेल इतरांपासून वेगळे करण्यात मदत होते, असे ठाणे टपाल विभागाने कळविले आहे.
राखी लिफाफे सोयीस्कर आकारात उपलब्ध आहेत आणि सहज सील करण्यासाठी पील ऑफ स्ट्रिप सीलची सोय केली आहे. तसेच हे लिफाफे आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. या राखी लिफाफ्यांची किंमत जीएसटीसह प्रति लिफाफा रु. 12.00 इतकी किफायतशीर आहे. हे राखी लिफाफे संपूर्ण भारत आणि परदेशात स्पीड पोस्ट आणि नोंदणीकृत पोस्ट सेवांद्वारे पाठविले जाऊ शकतात. सर्व सभासदांच्या सोयीसाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राखीच्या वस्तू स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तरी बहिणींनी या संधीचा लाभ घयावा असे आवाहन ठाणे टपाल विभागाने केले आहे.



