ताज्या घडामोडी
पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी बाबासाहेब दगडे यांची बिनविरोध निवड
ठाणे दि : कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. ठाणे या संस्थेच्या संचालक मंडळाची *सन 2025 – 2026 ते 2030 – 2031* या कालावधी करता निवडणूक झाली. या निवडणुकीत बाबासाहेब दगडे यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे तथा महाराष्ट्र राज्य हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. मुंबईचे अध्यक्ष व विद्यमान संचालक श्री.शिवाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. यामध्ये उपाध्यक्ष डॉ.श्री. शामराव पाटील, मानद सचिव श्री. वसंत पिसाळ व खजिनदार श्री. जानबा पाटील तर संचालक श्री.शिवदास गुरव,श्री. रमेश चव्हाण,श्री. बाबासाहेब दगडे ,श्री.विजय विचारे,श्री. सावकार गुंजाळ, श्री.शिवाजीराव ठिंकेकर,श्री. मारुती कोंडे,श्री. नितीन पाटील ,श्री.समीर विन्हेरकर,श्री. संदीप कर्डक, संचालिका श्रीम.लता पाटील,श्रीम. दर्शना जानकर यांचा समावेश आहे. सर्व स्तरावरून संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्री.बाबासाहेब दगडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


