आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा

ठाणे दि : धनगर प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकारणाचा नारा देण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.

मकरसंक्रांतीनिमित्त ठाण्यातील जांभळी नाका,मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले.या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम,माजी नगरसेविका नंदिनी विचारे,संगीता संजय हेरवाडे, माजी नगरसेविका पूजा वाघ,सौ वैष्णवी पवार,कविता चव्हाण,भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर महिला अध्यक्ष वर्षा माने,शिवसेना शाखा संघटक अनिता हिलाळ,विभागप्रमुख निकिता कामत,संगीता वनमाने,मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर आदींसह विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती राहिली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर,सचिव गायत्री गुंड, उपाध्यक्ष संगीता खटावकर,उपसचिव अश्विनी पळसे,खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लागार मीना कवितके,रतन वीरकर,सदस्य राजश्री भादेकर, सुजाता भांड, ज्योती कवितके, मनीषा शेळके,शीतल डफळ,सीमा कुरकुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??