आपला जिल्हा

मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

            मुंबईदि. 27 : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठीचित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

            ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकरसुकन्या कुलकर्णीयोगेश सोमणसंतोष पाठारेअलका कुबलतेजस देऊसकरविद्या करंजीकरदिग्पाल लांजेकरमहेश कोळीअभिजीत साटमसमीर आठल्येसचिन परबडॉ. जयश्री कापसेशैलेंद्र पांडेश्रीरंग देशमुख हे 15 अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

            चित्रपट परिक्षणाकरिता 33 टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??