सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यावतीने विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यावतीने विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
सुधागड तालुक्याच्या विकासासाठी परदेशातील तालुकावासी तरुणांनी पुढे येण्याचे बजरंग खाडे यांचे आव्हान
ठाणे : ठाण्यात वास्तव्य असलेल्या सुधागड तालुका वासियांच्या विकासासाठी झटणाऱ्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी ठाण्यातील मराठा मंडळ सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष बजरंग खाडे यांचे मार्गदर्शन सुधागड तालुका वासी व विद्यार्थी यांना लाभले. बजरंग खाडे यांनी सुधागड तालुक्यातील जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी गेले आहेत त्यांनी सुधागड तालुक्याच्या विकासासाठी पुढे यायला हवं. सुधागड तालुका रहिवासी हा ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर नालासोपारा ते मुंबई असा नोकरी व्यवसायानिमित्त व्यापलेला आहे. तालुक्यातील अनेकांची मुले ही परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा नोकरी करीत आहेत मात्र आपल्या समाजाची नाळ त्यांनी न सोडता तालुक्याच्या विकासासाठी सामाजिक संस्थांना हातभार लावणे आवश्यक आहे. आमच्यासारखे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुठली पन्नास वर्षे संस्थेसाठी कार्यरत आहोत. आता तरुणांनी संस्थेच्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमात हातभार लावणे आवश्यक आहे त्यासाठी ठाणे रायगड मुंबई आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या सुधागड वासियांनी पुढे येणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सागर तालुका रहिवासी सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या सुवर्ण महोत्सव वाटचाली तालुक्यातील ज्येष्ठ जुन्या जाणत्या माणसांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्यामुळेच ही संस्था नावारुपास आली. आज पन्नास वर्षे यशस्वी वाटचाल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुधागड तालुका रहिवाशांसाठी ठाण्यात स्वतःचे सभागृह उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तालुका वासियांनी संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा हात दिल्यास हे सभागृह लवकरच उभे राहील असा विश्वास व्यक्त करत गेली पंधरा वर्षे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ विद्यार्थी दत्तक पालक योजना व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करीत आहे. तसेच सुधागड तालुक्यातील 13 तेरा शाळांतील गरीब गरजू मागास विद्यार्थी यांची शैक्षणिक फी व शालेय साहित्य वाटप करीत आहे. या कार्यात टाटा कॅपिटल सारख्या नामवंत संस्थेकडून सुधागड तालुक्याला सी एस आर फंड मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत आहे. तसेच सैनिकी शिक्षण, पोलीस भरती, यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुधागड तालुक्यातील मुलं पुढे येत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. सुधागड तालुक्याच्या सर्वच उपक्रमांमध्ये तालुका वासियांनी जो सहभाग दाखवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे गौरव उद्गार घाडगे यांनी काढले.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आयोजित विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी गुणगौरव सोहळा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मुंबई अध्यक्ष बजरंग खाडे, उद्योजक संतोष बगडे, सरचिटणीस राजू पातेरे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, चिटणीस अविकांत साळुंखे, ज्येष्ठ सल्लागार, विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, सुधीर मांढरे, सुरेश शिंदे, गणपत डिगे, रमेश सागळे, चंद्रकांत बेलोसे, प्रवीण तेलंगे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, अंतर्गत हिशेब तपासणी दत्तात्रय सागळे, शिक्षण समिती प्रमुख अनिल सागळे, उपशिक्षण समिती प्रमुख श्याम बगडे, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, उपक्रिडा समिती प्रमुख जयगणेश दळवी, सांस्कृतिक समिती प्रमुख जनार्दन घोंगे, उपसांस्कृतिक समिती प्रमुख रघुनाथ इंदुलकर, संपर्कप्रमुख सुनील तिडके, आरोग्य समिती प्रमुख राजेश बामणे, प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव, सहाय्यक भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, बबन चव्हाण, गजानन जंगम, प्रकाश वाघमारे, हरिश्चंद्र मालुसरे, मोहन भोईर, प्रवीण बामणे यांच्यासह महिला पदाधिकारी वैशाली खेरटकर, वीणा घाडगे, सुलोचना जाधव, शर्मिला काळभोर, माधुरी भोईर, वैशाली महाले, शारदा लाड, सरिता चोरगे, दर्शना जाधव, स्वरांगी काळभोर, सौंदर्य तेलंगे, सुरेखा खाडे, आशा डीगे, तीर्था डिगे तसेच सुधागड वासी विद्यार्थी व पितृछत्र हरपलेले, विद्यार्थी, पालक, दिव्यांग विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजीव पातेरे, चिटणीस अविकांत साळुंखे व राकेश थोरवे यांनी केले.




