बाजारपेठ पोलीस ठाणे-बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र बाळगणे अन्वये गुन्हा दाखल

बाजारपेठ पोलीस ठाणे-बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र बाळगणे
बाजारपेठ पोलीस ठाणे चे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सपोनि/रूपवते, पोहवा/सचिन साळवी, व त्यांचे पथकाने दि.14.08.2023 रोजी 03.15 वा.चे सुमारास, स्वागत बेकरी, वल्लीपीर पोलीस चैकीजवळ, कल्याण पश्चिम येथे, आरोपी क्र.1) सुरज संतोष राजगुरू, वय-22 वर्षे, मु.पो.धुळगांव, ता.येवला, जि.नाशिक 2) राहुल किसन मांजरे, वय-21 वर्षे, मु.पो.धुळगांव, ता. येवला, जि.नाशिक 3) साजन दगु आहेर, वय-23 वर्षे, रा. मु.पो.धुळगांव, ता.येवला, जि.नाशिक 4) देवकिसन मोतीलाल कुमेरीया, वय-37 वर्षे, रा.पानवाडी,नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे ताब्यात एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. क्रं. II 223/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, चारही आरोपींस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/रूपवते हे करीत आहेत.

