सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन
ठाणे ः ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष 1 मे 2025 ते 1 मे 2026 वर्षानिमित्त रविवार 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजता मराठा मंडळ सभागृह, हरिनिवास सर्कलजवळ, ठाणे येथे विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास ठाण्यातील सुधागडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार्या वरील सोहळ्यास सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, मुंबई माजी अध्यक्ष बजरंग खाडे, उद्योजक तथा समाजसेवक विजय तांबे यांचे मार्गदर्शन लाभणार असून सुधागड मित्र सुरेश मेश्राम, उद्योजक रमेश सागळे, ज्येष्ठ समाजसेवक सौ. अंजली केळकर व वसंत केळकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व सुधागडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी केले आहे.



