ताज्या घडामोडी

ठामपातर्फे 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024’ प्रदर्शन

ठामपातर्फे 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024’ प्रदर्शन

 

ठाणे (24) : पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत पर्यांवरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती, मखर व इतर सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्री उत्सव 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 पर्यत ठामपा शाळा क्र. 19, विष्णुनगर, ठाणे येथे आयोजित केला आहे.

            या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या शुभहस्ते व ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे.

            प्लास्टर ऑफ पॅरिस बनविलेल्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचा –हास होतो, पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने महापालिकेतर्फे विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गणेशभक्तांना पर्यांवरणस्नेही गणेशमूर्ती व इतर साहित्य यांचे विविध पर्याय उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  तसेच प्रभागसमितीनिहाय मोफत जागा ही देण्यात आली असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.

            पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून कुशल मूर्तीकारांनी शाडू माती, लाल माती, गोमय, पुठ्ठा तसेच कागदाचा लगदा व पर्यावरणस्नेही रंग इत्यादीपासून बनविलेल्या आकर्षक गणेशमूर्ती तर मखर व सजावटीचे इतर साहित्य देखील उपलब्ध असणार आहे.

उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून ‘पर्यावरणपूरक उत्सव – काळाची गरज’  या विषयावर तज्ञ व्यक्तींचा परीसंवाद, नागरिकांसाठी निष्णात मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा, कागद – पुठ्ठा यापासून सजावटीचे साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.  या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा करावा असे आवाहनही ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??