ताज्या घडामोडी
पंडीत धायगुडे रविवारी करणार गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

ठाणे दि : काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो…असाच ध्यास घेतलेले पंडित धायगुडे येत्या रविवारी गिनीज वल्ड रेकॉर्ड करणार आहेत.
देशाचं नाव गिनिज बुकमध्ये न्यायचं स्वप्न उरी बाळगून २००९ पासून त्यासाठी तयारी करत असलेल्या पंडित धायगुडे यांनी याआधी देखील २५७ किलो वजनाच्या दोन बाइक लागोपाठ १२१वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती . स्वतःचच रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी येत्या रविवारी दिनांक ७ मे २०२३ रोजी सकाळी ८:३० ते ११:३० दरम्यान पुन्हा एकदा ठाणे पूर्व येथील धर्मवीर मैदानात २५७ किलो वजनाच्या पाच बाइक लागोपाठ १५० वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम करणार आहे.
मूळचे जत सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे कराटेत ४ टाईम ब्लॅक बेल्ट असून धायगुडे यांनी गिनीज बुकमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून गिनीज बुकने त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं आहे. त्याप्रमाणे ठाणे पूर्व येथील धर्मवीर मैदानात येत्या रविवारी ते प्रात्येक्षिक सादर करून त्याचा व्हिडिओ ते पाठवणार असून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.तरी आपण मला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान पंडित धायगुडे यांनी केले आहे
अधिक माहितीसाठी – पंडित धायगुडे : ९१६७२७०८६७


