ताज्या घडामोडी

वाॅक फाॅर नेशन सौंदर्य स्पर्धेत पत्रकार रोहिणी दिवाण यांना मिळाला द्वितीय क्रमांकाचा मुकुट

वाॅक फाॅर नेशन सौंदर्य स्पर्धेत पत्रकार रोहिणी दिवाण यांना मिळाला द्वितीय क्रमांकाचा मुकुट ,
ठाणे ( रोहिणी दिवाण)  कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने  व्हॅलिएंट फेम आयकाॅन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आणि ब्यूटी बीऑईन्ड बाॅर्डरस अंतर्गत  भायखळा येथील लोकशाहिर अण्णा भाऊ साठे सभागृहात वाॅक फाॅर  नेशन या संकल्पनेवर आधारित  स्पर्धकांचा रॅम्पवॉक  आणि ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  सेवा निवृत्त आर्मी  नेव्ही, एअरफोर्स अधिकारी आणि कारगील वीर यांच्या   वैशिष्ट्य पूर्ण  रॅम्पवाॅकने  उपस्थितांची मने तर जिंकली कर्नल जोशी यांच्या भावपूर्ण उद्गाराने डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
अतिशय जोश पूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत वय वर्षे ५० पेक्षा अधिक या मिसेस कॅटॅगिरीत    ठाणे जिल्ह्यातील दै जनादेश पत्रकार रोहिणी दिवाण यांना फर्स्ट रनरपचे म्हणजे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक  पटकावले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तसेच परीक्षक  तथा लावणी नृत्यकार अश्मिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मुकुट 👑 घालून गौरविण्यात आले.   वाॅक फाॅर नेशन  मिसेस गटात चंदीगड पासून ते   मुंबईतील  वय वर्षे ७५ क्षमा पालकर  तर ठाण्यातून  पत्रकार रोहिणी दिवाण आणि  प्रथम क्रमांक विजेत्या  निलिमा नागावकर यांचा  सहभाग होता .
समाजात ध्वजदिन निधी बाबत जागरूकता होणे हे उद्दिष्ट  या कार्यक्रमाचे  उद्दिष्ट होते.  वाॅक फाॅर नेशन या माध्यमातून जमा झालेला एक लाख एक हजार १११रूपयांचा धनादेश संचालिका  अंजली साखरे यांच्या हस्ते मेजर प्रांजल जाधव  यांना सुपुर्द करण्यात आला. या वेळी मेजर जाधव यांनी मुलांना  कारगिल पीकी बॅंक साठी एक डबा तयार करा आणि या मध्ये दररोज एक रूपया टाकण्याचे आवाहन केले.
दरम्यान मनोज सानप यांचा  शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर ४ हजार ५०० एकपात्री  प्रयोगाचे सादरीकरण वीरमाता अनुराधा गोरे यांच्या उपस्थितीत  सादर करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे म्हटले. या प्रसंगी संपूर्ण सभागृह मनोज सानप यांच्या सह   भावूक  झाले होते.
आजच्या तरूण पीढीला स्वयंशिस्त , भारतीय सैन्याविषयी आदरभाव  राखण्याचे आवाहन  जिल्हा माहिती अधिकारी सानप यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??