सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
ठाणे, दि. 26 ः सुधागड तालुक्याच्या व तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणारी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवार 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल घाडगे यांचे अध्यक्षतेखाली सहयोग मंदिर, घंटाळी रोड, ठाणे येथे आयोजित केला आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी व तालुकावासीयांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदा दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांना ‘सुधागड मित्र’ पुरस्काराने तर सुधागडातील ज्येष्ठ समाजसेवक आत्माराम खरीवले यांना विशेष पुरस्कार व मास्टर्स आर्किटेक्ट (आर्किटेक्ट 5वर्षे + मास्टर्स 2 वर्षे) पदवी प्राप्त केलेल्या कु. पूर्वा दिपक दळवी हिचा ‘विशेष पुरस्कारा’ने तर वकीली सनद मिळविल्याबद्दल स्वप्निल अनंत कालेकर आादींचा सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, सुधागड मित्र, (मार्गदर्शक) विजय तांबे, सुरेश मेश्राम, सुधागडमित्र तथा समाजसेवक विजय सागळे, उद्योजक तथा समाजसेवक अंजली व वसंत केळकर, सुधागड तालुका मराठा समाज कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित सदाशिव बारस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी, बारावी आणि उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांचे स्वागत, विशेष पुरस्कारने सन्मानित मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत आर्थिक मदतीचे वितरण, इ. 1 ते 9वी विशेष गुण संपादत विद्यार्थी बक्षिस वितरण, पदवीधर (डीग्री) परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण, 2024-25 या शैक्षणिक वर्षात सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील पितृछत्र हरपलेल्या दिव्यांग व गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक फी, शालयेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व सुधागड तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व सरचिटणीस राजू पातेरे यांनी केले आहे



