आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
हिताक्षी बोडेकर हिचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

ठाणे दि : ठाण्यातील वागळे इस्टेट विभागात हिताक्षी जनार्दन बोडेकर हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४०टक्के गुण मिळवून वागळे इस्टेट विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला.त्याबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिताक्षीचा सत्कार करण्यात आला.
ठाण्यातील हिताक्षी ही वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावची कन्या आहे. तिचे वडील जनार्दन बोडेकर हे ठाणे वन विभागात कुर्ला परिमंडळ वनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हिताक्षीने मिळविलेल्या यशाबद्दल ठाण्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून सत्कार केला जात आहे. ठाणे पश्चिम येथील वागळे इस्टेटमधील सेंट लॅरिन्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या या सत्कार समारंभाला शिवसेनेचे (शिंदे गट) नेते, आमदार रवींद्र फाटक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.



