आपला जिल्हाताज्या घडामोडी
मो.ह.विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

ठाणे, दि. २२ – जनरल एजुकेशन इंस्टिट्यूटचे मो.ह.विद्यालय व अभिरूची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
अभिरुची मंडळ ही आजी-माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उत्कर्षासाठी १९७५ ला स्थापन केलेली संस्था आहे. हे वर्ष संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
या प्रसंगी शाळेतील आजी शिक्षिका उपप्राचार्या सौ.अनुराधा कुलकर्णी, माजी शिक्षिका सौ. विजयालक्ष्मी धडके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सुनील काठे यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. अतुल वालावलकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज.ए.ई दादर या संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेन्द्र साळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मनीषा कुलकर्णी यांनी केले. आभार श्री.कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास अभिरुची मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तामरस, संस्थेचे पदाधिकारी, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. माया बेंद्रे यांनी केले.