आपला जिल्हाताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी सीताराम राणे – तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

ठाणे,दि.२४ (प्रतिनिधी) :  ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी आज सीताराम राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यादा सीताराम राणे यांनी फेडरेशनचा हा गड राखल्याने मंगळवारी आ. संजय केळकर यांनी राणे व त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन केले.
ठाणे हौसिंग फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक ८ जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व २१ संचालक भरघोस मताधिक्याने निवडून आले.सलग तिसऱ्यादा सीताराम राणे यांच्या पॅनेलने फेडरेशनवर वर्चस्व राखले.आज निवडून आलेल्या संचालकांमधून सीताराम राणे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासह निंबा पाटील यांची उपाध्यक्षपदी तर ज्ञानू चोरगे यांची मानद सचिवपदी , डॉ. राजाराम दळवी यांची सहसचिवपदी आणि  कोषाध्यक्ष म्हणून हिंदुराव गळवे याची बिनविरोध निवड झाली.

           मंगळवारी ठाणे स्टेशन नजीकच्या हौसिंग फेडरेशनच्या कार्यालयात आ. संजय केळकर आणि परिवहन सदस्य विकास पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारुन सीताराम राणे यांनी कारभार हाती घेतला. यावेळी बोलताना सीताराम राणे यांनी, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी या सगळ्या प्रक्रियेत मनापासून सहकार्य केले. त्याबद्दल सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासद पदाधिकाऱ्यांचे आभार मानुन सर्वाना धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??