ताज्या घडामोडी
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवहन सभापती विलास जोशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त प्रशांत रोडे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, कार्यालयीन अधीक्षक दत्ता गोंधळी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


