आपला जिल्हा
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

ठाणे, दि. 26 (जिमाका) – ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, रेवती गायकर, पुरवठा अधिकारी राजू थोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



