आपला जिल्हा

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ मतदानासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

ठाणे, दि. 23 (जिमाका) –  मा. भारत निवडणूक आयोगाचे दि. २४ डिसेंबर २०२२ च्या अधिसूचनेद्वारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने दि. ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.

            आगामी विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदार संघाची निवडणुकाकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरण्याबाबत मा. भारत निवडणूक आयोग यांच्या कडील पत्र क्र. NO.३/४/ID/ २०२२/SDR/ (Councilis).      दि. ११ जानेवारी  २०२३ अन्वये आदेश दिले आहेत.

  1. आधार कार्ड, 2.वाहनचालक परवाना, 3.पॅन कार्ड, ४ भारतीय पारपत्र, ५ केंद्र राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, ६. खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, ७. संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, ८. विद्यापीठद्वारा वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, ९. सक्षम अधिका-याने दिलेले शारिरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, १०. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले यूनिक डिसेबिलीटी ओळखपत्र (UDID) पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येईल, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??