क्राईम न्युज
खडकपाडा पोलीस ठाणे – घरफोडी चोरी

दि.11/08/ 2023 रोजी दुपारी 16ः00 वा. ते रात्रौ 20ः30 वा. चे दरम्यान, फिर्यादी श्री.मोईज असगरअली राजोडी, वय 68 वर्षे, व्यवसाय-एसी रिपेअरींग, रा.कल्याण पश्चिम यांचे राहते घराचे दरवाज्याचा कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन त्यावाटे आत प्रवेष करून, लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 6,77,000/- रूपये किमंतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. I 447/23 भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/भिसे हे करीत आहेत.

