आपला जिल्हा

सोमवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

ठाणे 27 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुध्दी केंद्रातील उन्नतीकरण व मजबूती करणाची कामे हाती घेतलेली आहेत. यापैकी प्रथम टप्याच्या कामातील काही जोडण्या करण्याकरीता सोमवार दि. ३०/०१/२०२३ रात्री १२.०० ते मंगळवार दि. ३१/०९/२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहेत. परिणामी  या कालावधीत  २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाने पत्राने कळविले आहे.

या शटडाऊनमुळे सोमवार दि. ३०/०१/२०२३ रात्री १२.०० ते मंगळवार दि. ३१/०९/२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेतील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासून मुना फायरबिग्रेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम. व्हॅली, अमृत नगर, अलमास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समिती मधील गणपती पाडा, विटावा, कळवा गाव, मनिषानगर, खारीगांव. पारसिकनगर, कळवा पूर्व व कोलशेत या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील, याची नागरीकांनी नोंद घ्यावी

वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी कर पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरीकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??