आपला जिल्हा

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर – रुपाली चाकणकर

            संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून. आयोगापुढे नवी आव्हाने  आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार,सायबर गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी फेसबुकने सुरु केलेले मिशन ई सुरक्षा‘ कॅम्पेन महत्त्वाचे आहे. मागील पंढरपूरच्या वारीमध्ये राज्य महिला आयोगाने आरोग्य वारी आपल्या दारी उपक्रम सुरु केला. या  सॅनिटरी नॅपकिन प्रथमच पुरवले.गेल्या 13 ते 14 महिन्यात आयोगाने विविध समस्या साडेदहा हजार केसेस दाखल केल्या त्यातील 9 हजारांहून अधिक केसेस निकाली काढल्या असेही  श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या.

            श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या,मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे.पुणेपिंपरी चिंचवड मधील 85 महिला व युवती ओमानमध्ये अडकल्या आहेत.महाराष्ट्रातील महिला व युवतींची संख्या अडीच ते तीन हजारावर आहे.

            नोकरीचे अमिष दाखवत व्हिसा व पासपोर्ट काढून घेतले गेले आहेत.या महिलांवर लैंगिक अत्याचार केले गेले. भारतीय दुतावासासोबत संपर्क साधून पाठपुरावा करून या महिलांना सोडवणे गरजेचे आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टीव्ह होणे गरजेचे आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक व बीट मार्शल शाळेच्या आवारात ठेवा. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांचे स्वतंत्र विभाग सुरु केले आहे. 25 खाटांचे हा विभाग लवकर सुरू केला जावा, अशी सूचनाही श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केली.

            जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडेपोलिस अधीक्षक अभिनव देशमुखविधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचाय तीचे सरपंच सूर गोंडा पाटीलसामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान  करण्यात आला.

            राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आलाआयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशनराज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.                                    

            राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी प्रास्ताविक केले. महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनमहिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडेइंटरनॅशनल जस्टिस मशीन चे संचालक येसुदास नायडूफेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैनयांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??