रक्कम ऑनलाईन काढुन घेवुन केली आर्थिक फसवणुक

मध्यवर्ती पोलीस ठाणे –
माहिती तंत्रज्ञान अधिनियम
दि.27.06.2023 रोजी दुपारी 14.10 वा. ते 14.16 वा. चे दरम्यान, फिर्यादी श्री.दिपक रामचंद्र लालवाणी, वय 43 वर्षे, व्यवसाय रियल इस्टेट, रा.उल्हासनगर-3 जि.ठाणे यांना कोणीतरी अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हाटस्याप अप मॅसेज करून त्यात एक लिंक पाठविली. व फोन करून आयडीएफसी बॅंकेचा कर्मचारी बोलत आहे असे सांगुन सदर लिंक व्दारे त्यांना एक रूपया पाठवुन ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीत याने फिर्यादी यांचे कोटक बॅंक क्रेडीट कार्ड बॅंक खातेतुन एकुण 5,01,014/- रूपये रक्कम ऑनलाईन काढुन घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपींविरूध्द गुन्हा रजि. क्रमांक ।। 416/23 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि(गुन्हे)/श्री.सुहास आव्हाड हे करीत आहे.

