ताज्या घडामोडी

कोल्हापूर, ठाणे येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये स्टारफिश फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

ठाणे, 25 :  नुकत्याच कोल्हापूर येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या तीन जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली. जलतरणपटू निधी सामंत हिने 3 सुवर्णपदकासह विजेतेपद, सोहम साळुंखे यांनी 3 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य तर शर्वन पेठे १ सुवर्ण ४ रौप्य  पदक पटकाविले.

ठाण्यातील कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे कै. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनने सांघिक विजेतेपद पटकाविले. तर मानव मोरे याने 1 सुवर्ण व 3 रौप्य पदकांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
तर सवर आकुस्कर हिने 4 सुवर्णपदकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले, स्नेहा लोकरे हिने 3 सुवर्णपदकासह 1 रौप्य व वैयक्तिक विजेतेपद प्राप्त केले. आयुषी आखाडे हिने 4 सुवर्णपदकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले, फ्रेया शाह हिने 2 सुवर्ण व 2 रौप्यपदकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. तर माही जांभळे हिने 4 सुवर्णपदकासह वैयक्तिक विजेतेपद प्राप्त केले. गार्गी शेटकर हिने 1 सुवर्णपदक व 3 रौप्यपदकासह वैयक्तिक विजेतेपद प्राप्त केले.  रुद्र निसार याने 1 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविले. ओजस मोरे याने 3 कांस्यपदक पटकाविले नायरा कौशल हिने 3 रौप्य व 1 कांस्यपदक प्राप्त केले. नक्ष निसार याने 1 कांस्य पदक प्राप्त केले तर परीन पाटील याने 4 कांस्यपदके पटकाविली. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे, रुपेश घाग, अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
सर्व विजेत्या जलतरणपटूंचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त ( क्रीडा)  मीनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर
उप व्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक केले आहे. तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनीही जलतरणपटूंचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??