आपला जिल्हा
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक २०२३ छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन यांचे आयोजन
जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी स्पर्धेत सहभागी व्हावे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (०९) : – जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने’,ठाणे महापालिका चषक २०२३ या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जात असून या स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १८ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत तीन हात नाका येथील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिली.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘News Photogrphy’, ‘landscape’, ‘Daily Life’, राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ‘Smart City’, ‘Arial Photogrphy’, ‘Festival’ तर, जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ हे विषय ठेवण्यात आले आहे. तसेच तरुण छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी ‘पावसाळा’ हा विषय देण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी पाच लाख ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषीकांसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५० हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी १५ हजार तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी छायाचित्रकारांनी या संकेतस्थळाला http://www.tsdps.in भेट द्यावी. संकेतस्थळावर स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येईल. या स्पर्धेतील विजेती व निवडक छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात येतील.
अधिक माहितीसाठी श्री. विभव बिरवटकर ( 9867782287), श्री. दीपक जोशी ( 9821719988) आणि श्री. सचिन देशमाने (9833924399) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभागी होवून ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.



