रक्कम ऑनलाईन काढुन घेवुन केली आर्थिक फसवणुक

बदलापुर पश्चिम पोलीस ठाणे –
माहिती तंत्रज्ञान अधिनियम
दि.22.06.2023 रोजी रात्रौ 22.00 वा. ते 22.19 वा. चे दरम्यान, फिर्यादी श्री.शैलेशकुमार तुलसीदास शहा ,वय 50 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा.बदलापुर पश्चिम , जि.ठाणे यांना कोणीतरी अनोळखी मोबाईलधारक इसमाने फोन करून TEAM VIWER हे अॅप डाउनलोड करण्यास सांगुन त्याव्दारे लाईटबील भरण्यास सांगितले. आरोपीत याचे सांगणेप्रमाणे फिर्यादी यांचे मुलाने सदर अॅपमधील MSEDCL साईट ओपन करून त्यावर 100/- रूपये पाठविले. त्यांनतर आरोपीत याने त्यांचेकडुन रजिस्टर मोबाईल नंबर घेवुन त्यांचे बॅंक खातेतुन एकुण 3,67,760/- रूपये रक्कम आॅनलाईन काढुन घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपींविरूध्द गुन्हा रजि. क्रमांक ।। 160/23 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/ठाकरे हे करीत आहे.

