ताज्या घडामोडी

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. 27 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके दि. १ जानेवारी२०२३ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आली आहेत. तथापिया पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. २ मार्च२०२३ हा असणार आहे.

            विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी२०२३ ते २ मार्च२०२३) येणाऱ्या प्रवेशिका व पुस्तके स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमुंबई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??